

ANIL KAPOOR
ESAKAL
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मराठी चित्रपटात काम केलंय. छोटीशी भूमिका का असेना पण त्यांना ती भूमिका करून खूप छान वाटतं. आपण मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचा आनंद असतो. बॉलिवूडचे अनेक कलाकारही मराठी सिनेमाचं कौतुक करताना दिसतात. असं असलं तरी मराठी कलाकार खूप आधीपासूनच हिंदी चित्रपटात दिसलेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, वर्षा उसगावकर, नाना पाटेकर, अश्विनी भावे असे अनेक कलाकार हिंदीमध्ये काम करताना दिसले.