
लोकेश कनगराज यांच्या 'कुली' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट २०२५ मधील तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक प्रोमो देखील रिलीज केला, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकीकडे हा प्रोमो चर्चेत असताना, दुसरीकडे रजनीकांत, आमिर खान आणि अक्किनेनी नागार्जुन यांच्या चित्रपटाच्या मानधनाची देखील चर्चा होत आहे. रजनीकांत यांना या चित्रपटासाठी इतकं तगडं मानधन मिळत आहे की ते आशियातील सर्वाधिक मानधन घेणारे आणि सर्वात महागडे अभिनेते बनले आहेत.