
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृण्मयी देशपांडेने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ती एकटीच नाही, तर तब्बल सहा लोकप्रिय अभिनेत्यांच्या संगतीत आहे! ‘मना'चे श्लोक या आगामी चित्रपटात हे सहा अभिनेते दिसणार असल्याचं आधीच समोर आलं होतं, परंतु आता या नव्या फोटोमुळे चाहत्यांच्या आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.