कोट्यवधींची संपत्ती, महागड्या कार, श्रद्धाला डेट करणाऱ्या राहुल मोदीची कमाई किती? कशी सुरू झाली त्यांची लव्हस्टोरी

Shraddha Kapoor New Boyfriend: अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतीच तिच्या आणि राहुल मोदीच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
shraddha kapoor boyfriend
shraddha kapoor boyfriend sakal
Updated on

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. गेले अनेक महिने सुरू असलेल्या चर्चांवर तिने पूर्णविराम लावला. तिने पोस्ट करत आपल्या आणि राहुल मोदीच्या प्रेमाची कबुलीच दिली. 'दिल रख ले, नींद तो वापस दे यार' असं म्हणत तिने तिच्या आणि राहुलच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. मात्र अशातच राहुल मोदी नेमका आहे तरी कोण असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरू झाली? चला जाणून घेऊया राहूल मोदीबद्दल.

राहुल हा मूळचा मुंबईचा आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब हे बिझनेस करतं पण राहुलने वेगळी वाट निवडत फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. त्याला चित्रपटांची आवड असल्याने त्याने चित्रपट निर्मिती शिकण्यासाठी व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्याने तिथे इंटर्न म्हणून काम केलं. तो लव रंजन याच्या 'प्यार का पंचनामा २' , 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटांचा लेखक आहे.

राहुलची संपत्ती किती?

राहुल हा व्यावसायिक कुटुंबातून येत असल्याने त्याच्या संपत्तीचा आकडा बराच मोठा आहे. त्याच्या पगाराबाबत अचूक माहिती नसली तरी त्याची संपत्ती जवळपास १ अब्ज ६६ कोटी एवढी आहे. श्रद्धा कपूर राहुल पेक्षा ३ वर्ष मोठी आहे. राहुलचा जन्म ७ ऑक्टोबर १९९० चा आहे. तर श्रद्धा चा जन्म ३ मार्च १९८७ चा आहे. श्रद्धा आणि राहुल यांची भेट 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसू लागले. श्रद्धा आणि राहुल अनेकदा डेटवर एकत्र दिसले आहेत. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात झालं. आता श्रद्धाने पोस्ट करत त्यांच्या नातं अधिकृत केलं आहे असं म्हणता येईल.

shraddha kapoor boyfriend
एकटा जीव..! नवऱ्याला सोडून एकटीच डोंगरात फिरतेय लोकप्रिय मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com