
छोट्या पडद्यावर पुढील महिन्याभरात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठीने नवीन मालिकेची घोषणा केलीये. झी मराठीवर लवकरच 'तारिणी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत ती एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारतेय. जगासमोर वेगळी आणि घरासमोर वेगळी असणारी ही तारिणी स्वतःच्या घरात परकी आहे. शिवानी सोनारच्या या प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. मात्र यासोबतच चर्चा आहे ती शिवानीसोबत दिसणाऱ्या अभिनेत्याची. हा अभिनेता नेमका कोण असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय.