

VEDAT MARATHI VEER DAUDALE SAAT
ESAKAL
मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यापूर्वी अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचं मोठं वर्चस्व आहे. लवकरच रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बिग बजेट आहे. मात्र या चित्रपटासोबतच आणखी एका बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांना आठवण झालीये. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल विचारणा होतेय. तो म्हणजे महेश मांजरेकर यांचा महत्वकांक्षी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात'. यातून छत्रपतींच्या सात शूर मावळ्यांची गोष्ट समोर येणार होती. मात्र हा चित्रपट आता डब्बाबंद झालाय का असा प्रश्न विचारला जातोय.