
आपल्या अभिनयाने कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गेली कित्येक वर्ष त्यांनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. 'माहेरची साडी' या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे पाहिलं नाही.एक सोशिक स्त्री अशी त्यांची ओळख चाहत्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे त्यांना भूमिका देखील तशाच ऑफर झाल्या. तब्बल १५ त्यांनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. मात्र त्यांच्या मुली कधीही या क्षेत्रात आल्या नाहीत. आता अलका यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे.