

AMRUTA KHANVILKAR
ESAKAL
'चंद्रमुखी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांची आवडती आहे. तिने 'साडे माडे तीन' चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मराठीसोबतच ती हिंदी चित्रपटांमध्येही दिसते. ती नुकतीच इम्रान हाश्मीसोबत 'तस्करी' या हिंदी वेबसीरिजमध्ये दिसली होती. अमृता तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने हिंदी अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केलंय. त्यांच्या लग्नाला तब्बल ११ वर्षाहून जास्त झालीयेत. त्यापूर्वीपासून अमृता हिमांशूला ओळखते. मात्र अमृता तिच्या सासरी राहत नाही. एका मुलाखतीत तिने याचं कारण सांगितलं होतं.