

CHINMAY MANDLEKAR EXIT FROM SHIVAJI MAHARAJ ROLE
ESAKAL
नुकताच दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' यातील सहावा चित्रपट 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' चा पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात या चित्रपटातील कलाकारांचे चेहरेही दाखवण्यात आले. मात्र या कार्यक्रमात सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार यावरून पडदा उठला. या चित्रपटात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र छत्रपतींची भूमिका साकारतोय. मात्र आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या शिवराय अष्टकातील पाच चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने महाराजांची भूमिका साकारली होती. अभिजीतला पाहिल्यानंतर चिन्मय या चित्रपटात का नाहीये असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.