
'धुमधडाका', 'थरथराट' यांसारख्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत तोडीस तोड काम करणारे लोकप्रिय अभिनेते दीपक शिर्के हे सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी मालिका, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. यासोबतच ते हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड गाजले. त्यांची 'तिरंगा' चित्रपटातील प्रलयनाथ गेंडास्वामीची भूमिकाही चांगलीच गाजली. अशाच अनेक चित्रपटात ते खलनायक म्हणून दिसले. मात्र रागीट चेहऱ्याच्या या खलनायकाला सिनेसृष्टीत बाप्पा म्हणून हाक मारतात. एका मुलाखतीत त्यांनी त्यांना बाप्पा हे नाव कसं पडलं याबद्दल सांगितलं आहे.