
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची व्यावसायिक कारकीर्द प्रचंड यशस्वी आहे.मात्र तिच्या चित्रपटांसोबतच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. विशेषतः तिच्या डेटिंग लाईफची खूप चर्चा झाली. जेव्हा दीपिका मॉडेल होती तेव्हा ती अभिनेता आणि सुपरमॉडेल मुझम्मिल इब्राहिमच्या प्रेमात पडली. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केलं मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत, दीपिकाचा एक्स प्रियकर मुझम्मिलने अभिनेत्रीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.