

ATHARV RUKE
esakal
सध्या सोशल मीडिया गाजवणारे अनेक कंटेन्ट क्रिएटर मराठी चित्रपटांमध्ये दिसतायत. असाच एक लोकप्रिय रील स्टार 'तुंबाडची मंजुळा' या सिनेमात झळकलाय तो म्हणजे अथर्व रुके. आपल्या हटके रिल्सने प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारा लोकप्रिय कंटेन्ट क्रिएटर अथर्व रुके याची 'तुंबाडची मंजुळा' या सिनेमात एंट्री ही एक त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकीत करणारी गोष्ट होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी त्याची चित्रपटात एंट्री कशी झाली याबद्दल सांगितलंय.