
छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतो. या मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांच्या घरातलाच एक भाग होतात. मात्र एखाद्या छान सुरू असलेल्या मालिकेमधील एखादा कलाकार जेव्हा अचानक मालिका सोडून जातो तेव्हा प्रेक्षकांनाही धक्का बसतो. अशाच एका अभिनेत्रीने अचानक मालिकेचा निरोप घेतला होता. अभिनेत्री दिशा परदेशी हिने अचानक झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा निरोप घेतला होता. आता तिने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.