
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने स्वतःच्या हिमतीवर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. कित्येक वर्ष ती मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करतेय. तिचं स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. नुकताच मुक्ताचा वाढदिवस झाला. मुक्ता ४६ वर्षांची आहे. मात्र ती अजूनही अविवाहित आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. आपल्याला लग्न करायचंच नाही असं ती कधीही म्हणाली नाही.