
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' वरून सध्या सोशल मीडियावर धुमश्चक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच 'चला हवा येऊ द्या २' चा पहिला प्रोमो समोर आला. यात काही जुने ओळखीचे चेहरे दिसले तर काही नवीन चेहरे दिसले. मात्र दिसला नाही तो चेहरा ज्याच्यामुळे हा कार्यक्रम सुरू झाला होता. तो म्हणजे निलेश साबळे. या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असलेल्या निलेशने कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारीदेखील उत्तमपद्धतीने हाताळली होती. मात्र या सीझनमध्ये तो न दिसल्याने निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या. आता अखेर निलेशनेच या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम लावलाय.