

sharyu sonawane
ESAKAL
छोट्या पडद्यावर दोन महिन्यांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे प्रेक्षक चकीत झाले. झी मराठीवरील लोकप्रिय 'पारू' मालिका अचानक बंद करण्यात आली. कथा न संपवता कोणताही शेवटचा भाग प्रदर्शित ना करता, प्रेक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता 'पारू' मालिका बंद करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारले होते. मात्र त्याची उत्तरं त्यांना मिळाली नाहीत. निर्मात्याने अचानक मालिका बंद केल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. आता 'पारू' मालिकेतूल मुख्य अभिनेत्री शरयू सोनावणे हिने एक व्हिडिओ शेअर करत सगळ्यांची माफी मागितली आहे.