

ravi jadhav on ajay atul
esakal
लोकप्रिय मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रेक्षकांना अनेक उत्कृष्ट चित्रपटांचा नजराणा दिला. 'नटरंग', 'बालगंधर्व', 'बालकपालक', 'टाइमपास' अशा चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र या चित्रपटांमध्ये 'नटरंग' या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली. मात्र त्यानंतर रवी जाधव यांनी अजय अतुलसोबत कधीही काम केलं नाही. त्या चित्रपटानंतर तुमच्यात भांडणं झाली का, किंवा काही बिनसलं का असा प्रश्न नुकताच त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी याचं खरं आणि स्पष्ट उत्तर दिलंय.