
मास्टर ब्लास्टर म्हणवला जाणारा भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सारा तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. सारा कधी तिच्या कुटुंबासोबत दिसते तर कधी बॉलिवूड कलाकारांसोबत दिसते. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वी सारा आणि शुभमन यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं होतं. त्यानंतर तिचं नाव अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी जोडलं गेलं. या सगळ्यात ती बॉलिवूडमध्ये येणार असल्याचं बोललं जातंय. आता साराने त्यावर मौन सोडलं आहे.