

shahid kapoor parents divorce
esakal
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर तीन वर्षांचा असतानाच त्याचे आई-वडील पंकज कपूर आणि नीलिमा अझीम यांचा १९८४ मध्ये घटस्फोट झाला. नंतर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केलं, तर नीलिमा अझीम यांनी अभिनेते राजेश खट्टरसोबत दुसरं लग्न केलं. आता, ४० वर्षांनंतर, नीलिमा अझीम यांनी पंकज कपूरपासून घटस्फोट घेण्यावर भाष्य केलंय. त्यांना पंकज यांच्यापासून वेगळं झाल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही; उलट, त्यांची दोन्ही मुलं, शाहिद कपूर आणि ईशान खट्टर त्यांच्य आयुष्यात असल्याने त्या आनंदी आहेत असं त्या म्हणाल्यात . ईशान खट्टर हा नीलिमा अझीम आणि त्यांचे दुसरे पती राजेश खट्टर यांचा मुलगा आहे.