
छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास करणारी एक हरहुन्नरी मराठी अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के. करिअरच्या शिखरावर असताना अभिनय सोडल्याची अनेक उदाहरणं आपण हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाहिली असतील. मात्र मराठीतही अशी काही उदाहरणं आहेत. त्यातील एक कलाकार म्हणजे नीलम शिर्के. नीलमने 'वादळवाट', 'पछाडलेला' यांसारख्या मालिका आणि चित्रपटात काम केलं. मात्र त्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. आता अनेक वर्षांनी दिलेल्या मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.