
Entertainment News: 'अग्गबाई सासूबाई', 'होणार सून मी या घरची' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. मराठी मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली तेजश्री आता चित्रपटांमध्येही झळकतेय. तिने बॉलिवूडमध्येही काम केलंय. तेजश्रीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. कालच म्हणजेच २ जून रोजी तेजश्रीचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस तिने दोन खास व्यक्तींसोबत साजरा केलाय. तिने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने स्वतः ही माहिती दिलीये.