

VIBHAVARI PRADHAN FROM YA GOJIRVANYA GHARAT
ESAKAL
छोट्या पडद्यावरील काही मालिका या प्रचंड गाजल्या. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही या मालिकांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात पिंगा घालतात. अशीच एक गाजलेली मालिका म्हणजे 'या गोजिरवाण्या घरात. या मालिकेने प्रेक्षकांना एकत्र कुटुंब पद्धती समजावलेली. तेव्हाच्या कुटुंबांचा आरसा असणारी ही मालिका घराघरात लोकप्रिय होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. असंच एक पात्र होतं दीक्षाचं. जी त्या घराची मुलगी होती. ती मालिकेत प्रमुख भूमिकेत होती. मात्र गेली अनेक वर्ष ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. आता तिने या मागचं कारण सांगितलंय.