

YATIN KARYEKAR
ESAKAL
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे लोकप्रिय अभिनेते यतीन कार्येकर यांनी मराठीसोबतच हिंदीमध्येही आपलं स्थान निर्माण केलं. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे यतीन यांनी मराठी अभिनेत्री इरावती हर्षे हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. ते दोघेही सुरुवातीला तीन वर्ष लिव्ह इन मध्ये राहिले होते. मात्र असं असूनही लग्नानंतर काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. ज्याचा यतीन यांना मोठा धक्का बसला होता. आता नुकत्याच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत यतीन त्याबद्दल बोलले आहे.