रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या जोडीला चाहते मोठी पसंती दाखवतात. दोघांची ऑनस्क्रीन केमिट्रीदेखील चाहत्यांना खूप भावते. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जुने सिनेमे चित्रपटगृहात प्रसिद्ध केले जात आहेत. अशातच पुन्हा एकदा 11 वर्षानंतर रणबीर-दीपिकाचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ये जवानी है दीवानी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या री-रिलीजच्या आधीच चाहत्यांनी बुकिंग केले होते. तर पहिल्या दिवशीही या चित्रपटाची मोठी कमाई झाली आहे.