Latest Bollywood News: आयन मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' एक सुपरहिट चित्रपट आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेला चित्रपटअजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलीन आणि आदित्य रॉय कपूर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांकडूनही मोठी पसंती मिळवली. 'एक था टायगर' व '३ इडियट' नंतर ३०० करोडच्या टप्प्यात हा चित्रपट सामील झाला.