

drishyam 3
ESAKAL
नुकताच अजय देवगन आणि तब्बू यांचा 'दृश्यम ३' प्रदर्शित झालाय. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरदेखील या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झालाय. आणि काही दिवसातच या चित्रपटाने तब्बल २५० कोटींचा आकडा पार केलाय. या सिनेमात काही मराठी कलाकारदेखील आहेत. मात्र एक मराठी कलाकार असा आहे जो चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात होता मात्र तिसऱ्या भागात नाहीये. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटतंय. हे कलाकार आहेत योगेश सोमण.