Yogita & Saurabh Wedding : "लग्नात अशी जपली आईची आठवण", योगिताने शेअर केला इमोशनल किस्सा

'जीव माझा गुंतला' या कलर्स मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सौरभ आणि योगीताने नुकतीच लग्नगाठ बांधली. मार्च महिन्यात पार पडलेल्या त्यांच्या सरप्राईज वेडिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Yogita & Saurabh Wedding
Yogita & Saurabh Wedding Sakal

'जीव माझा गुंतला' या कलर्स मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सौरभ आणि योगीताने नुकतीच लग्नगाठ बांधली. मार्च महिन्यात पार पडलेल्या त्यांच्या सरप्राईज वेडिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत योगिता आणि सौरभने त्यांच्या लग्नातील खास आठवण शेअर केली.

योगीताने तिच्या लग्नात तिच्या आईची खास आठवण गोष्ट वापरली. याबाबत सौरभ म्हणाला की, "मला ती कोणती साडी नेसणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. जेव्हा ती नाचत आली तेव्हा तिच्या वर जे धरलं होतं त्यात वापरलेली तिच्या आईच्या लग्नातील साडी आणि योगिताने नेसलेली साडी एकदम शोभून दिसतं होती. ते कलर कॉम्बिनेशन छान दिसत होतं."

याबाबत सविस्तर सांगताना योगिताने खुलासा केला की, "माझ्या डोक्यावर जी फुलांची चादर धरलेली तो माझ्या आईचा शालू होता आणि जो माझ्या आईचा शालू होता तसाच रंग असलेली साडी मी माझ्या लग्नात नेसली होती. मी माझ्या डिझायनरला हे सांगितलं होतं आणि तिने तशी साडी माझ्यासाठी बनवून आणली होती." असं ती यावेळी म्हणाली.

'जीव माझा गुंतला' मालिका सुरू होण्याच्या सहा महिने आधी योगिताने तिच्या आईला गमावलं. त्यामुळे तिने स्वतःच्या लग्नात आईची आठवण वेगळ्याप्रकारे वापरत तिचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर सौरभने त्यांचा वेडिंग टीझर शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये योगिता आईच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मालिकेचा सेटवरच सौरभ आणि योगिताची ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. योगिता आणि सौरभने त्यांचं रिलेशन सोशल मीडियापासून लपवून ठेवलं होतं. जास्तीत जास्त पर्सनल लाईफ न रिव्हील करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्यामुळेच आम्ही आमच्या हनीमूनचे फोटोजसुद्धा शेअर केले नाहीत असंही ते दोघे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

सौरभ सध्या सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत काम करतोय. तो या मालिकेत साकारत असलेली धनंजय ही भूमिका सगळ्यांना पसंत पडतेय. योगिताने सध्या टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com