

Yogita chavan
Esakal
सध्या सोशल मीडियावर मराठी कलाकारांचे घटस्फोट चांगलेच गाजतायत. थाटामाटात लग्न करणारे कलाकार आता वर्षा दोन वर्षातच वेगळे होण्याची घोषणा करतायत. ज्यामुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय. त्यात 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय ठरलेली मराठी जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा आहेत. सौरभ आणि योगिता यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलंय. त्यांनी त्यांचे लग्नाचे फोटोही डिलीट केलेत. त्यामुळे या अफवांना आणखी हवा मिळालीये. आता या चर्चांवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिलीये.