
झी मराठीवर गेल्या वर्षभरात काही नवीन मालिका प्रदर्शित करण्यात आल्या. यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काही मालिका लगेच बंद करण्यात आल्या. आता कमी टीआरपीमुळे झी मराठीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झालाय. या मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. ही मालिका आहे 'नवरी मिळे हिटलरला'. या मालिकेचा शेवटचा भाग आता शूट झालाय आणि शेवटच्या दिवशी कलाकार देखील भावुक झाले आहेत. त्यांनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.