
छोट्या पडद्यावर मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीची मोठी स्पर्धा पाहायला मिळते. कधीकाळी टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर असणारं झी मराठी आता सहाव्या ते सातव्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या चौथ्या स्थानावर असणारं स्टार प्रवाह गेली पाच वर्ष पहिल्या क्रमांकावर जाऊन बसलंय. त्यामुळेच टीआरपीमध्ये वर येण्यासाठी आणि आहे त्या स्थानावर टिकून राहण्यासाठी या दोन्ही वाहिन्या प्रचंड मेहनत करताना दिसतायत. गेल्या काही महिन्यात या दोन्ही वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. ज्यामुळे काही जुन्या मालिकांनी निरोप घेतला. आता अशाच काही मालिकांसाठी झी मराठीने तिच्या लोकप्रिय मालिकांची वेळ बदलली आहे.