
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये सध्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे. जान्हवीच्या आणि जयंतचा हा लग्नसोहळा शाही पॅलेसमध्ये सुरू आहे. त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कपाळाला हात लावलाय. ही कथा एका हिंदी मालिकेची कॉपी असल्याचं नेटकरी सांगत आहेत. सोबतच हा प्रोमोही सोशल मीडियावर ट्रोल होतोय. काय आहे हा प्रोमो?