
छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचे असतात. काही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात तर काही मालिका लगेच प्रेक्षकांचा निरोप घेतात. प्रेक्षक मालिका पाहण्यासोबतच त्यातील कलाकारांचे कपडे, घर, घरातल्या वस्तू सगळंच फार बारकाईने पाहत असतात. कधीकधी प्रेक्षकांना मालिकांमध्ये दाखवलेली घरं फार आवडतात. मात्र मालिकांमध्ये दाखवण्यात येणारी सगळीच घरं खरी नसतात. अनेकदा सेटवर मालिकांचं शुटींग केलं जातं. असेच झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेतील घराच्या सेटचे फोटो समोर आले आहेत. लोकमत फिल्मीच्या युट्युब चॅनेलवर या मालिकेच्या सेटचा इनसाइड व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.