
'लक्ष्मी निवास' मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका दाक्षिणात्य मालिकेचा रिमेक आहे. दररोज एक तास ही मालिका दाखवण्यात येते. मालिकेतील लक्ष्मी आणि निवास यांचा प्रवास आणि भावना आणि सिद्धूची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र या मालिकेतील जयंत आणि जान्हवी यांच्यावर प्रेक्षक पुन्हा एकदा संतापले आहेत. जान्हवी आणि जयंत यांचं वागणं पाहून प्रेक्षकांनी लेखकाला प्रश्न विचारले आहेत. नुकताच झी मराठीने मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित केलाय.