

laxmi niwas serial
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' ही प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. एकीकडे लक्ष्मी आणि निवास यांचा संघर्ष आहे. दुसरीकडे भावना आणि सिद्धू यांच्यातील प्रेम आहे तर तिसरीकडे जयंत आणि जान्हवी यांच्यातील संघर्ष आहे. जान्हवी आपल्या नवऱ्यापासून म्हणजेच जयंत पासून दूर पळत आहे तर भावना आपल्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्टात लढा देत आहे. एकाचवेळी मालिकेत तीन वेगवेगळे स्टोरी प्लॉट असल्याने प्रेक्षक मालिकेत गुंतले आहेत. अशातच आता प्रेक्षकांना अनपेक्षित असा ट्विस्ट मालिकेत येणार आहे. अखेर घरातल्यांना नको असतानाही भावनाच्या हातात आता गाडेपाटलांच्या घराच्या चाव्या येणार आहेत.