
गेल्या काही महिन्यात वाहिन्यांवर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या. नवीन मालिकांच्या येण्याने जुन्या मालिकांना मात्र प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. त्यात कमी टीआरपीचा देखील फटका या मालिकांना बसतो. झी मराठीवर अशाच दोन नवीन मालिकांची घोषणा झाली आहे. 'चला हवा येऊ द्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर आणखी एक मालिका 'कमळी' प्रेक्षकांना भुरळ घालायला सज्ज आहे. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता निखिल दामले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. या मालिकेसाठी एका मालिकेची वेळ बदलणार आहे. कोणती आहे ती मालिका?