
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिकांची सुरुवात होत आहे. पुढील महिन्याभरात झी मराठी आणि स्टार प्रवाहवर देखील नव्या मालिकांची नांदी होणार आहे. त्यापूर्वी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर काही मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्यात. अशातच काही दिवसांपूर्वी झी मराठीवरदेखील एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. 'लक्ष्मी निवास' ही मालिका नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आतल्या मालिकेची वेळही समोर आलीये.