
Marathi Serial News: छोटया पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात झी मराठी आणि कलर्स मराठीचाही समावेश आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर कालपासून म्हणजेच १६ डिसेंबर पासून एका नव्या मालिकेची सुरुवात झालीये. तर झी मराठीवरही काही दिवसांपूर्वी एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. झी वर 'लक्ष्मी निवास' या मालिकेनंतर 'तुला जपणार आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले होते. आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय.