

paaru serial off air
esakal
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. काही कारणामुळे या मालिकांची वेळ जरी बदलली तरी या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या रहातात. बदललेल्या वेळेत देखील प्रेक्षक मालिका पाहतात. अशीच एक झी मराठीची लोकप्रिय मालिका 'पारू' जिची वेळ बदलल्यानंतरही प्रेक्षक ही मालिका पाहणं पसंत करत होते. असं असताना अचानक ही मालिका बंद करण्यात आलीये. 'पारू' मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याचं बोललं जातंय. याबद्दल झी मराठीने कोणतीही पोस्ट केलेली नाही मात्र मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा रंगलीये. इतकंच नाही तर Zee वर देखील या मालिकेचे १० फ्रेब्रुवारी नंतरचे भाग प्रदर्शित करण्यात आलेले नाहीत.