

छोट्या पाड्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय. स्त्रीवर्ग आपल्या आवडत्या मालिका अगदी प्रवासातही पाहतात. काही मालिकांचे रिर पीट टेलीकास्टही पाहिले जातात. मात्र काही मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. टीआरपी कमी असल्यावर या मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीकडून घेतला जातो. अशीच एक मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला होता, मात्र पुन्हा मालिकेचा टीआरपी वाढल्याने वाहिनीने मालिका पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.