
गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. त्यात स्टार प्रवाह नवीन मालिकांसाठी अग्रेसर आहे. अशातच टीआरपी यादीत वर येण्यासाठी इतर वाहिन्या प्रयत्न करताना दिसतात. मात्र आता झी मराठीने इतर वाहिन्यांना टक्कर देण्यासाठी कंबर कसलीये. आता टीआरपी यादीत आपलं स्थान मिळवण्यासाठी झी मराठीने त्यांचा हुकुमाचा एक्का बाहेर काढलाय. गेले दोन सीझन गाजवणारा 'देवमाणूस' आता तिसऱ्या सीझनमध्ये परत येतोय. देवमाणूसचा मधला अध्याय यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.