Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Mazi Tuzi Reshimgath Remake in Hindi : झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या मालिकेच्या कथानकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया या नवीन मालिकेविषयी.
MTR remake in hindi
MTR remake in hindi

Hindi Television Update: झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही गाजलेली मालिका. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सिंगल मदर असलेली नेहा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा यश यांची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळाली. यात नेहाच्या मुलीचं काम केलेली बालकलाकार मायरासुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली.

झी मराठीवरील या गाजलेल्या मालिकेचा आता हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. झी टीव्ही या हिंदी चॅनेलवर ही नवीन मालिका सुरु झाली असून मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून ही मालिका प्रेक्षकांना पसंत पडतेय.

MTR remake in hindi
Prarthana Behere : 'म्हणून, आम्ही मूल होऊ दिलं नाही', प्रार्थनाने सांगितलं कारण

'मैं हूँ साथ तेरे' असं या झी टीव्हीवर सुरु झालेल्या नव्या मालिकेचं नाव असून २९ एप्रिलला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. करण व्होरा आणि उल्का गुप्ता यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका असून करण आर्यमान आणि उल्का जान्हवी ही भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या कथानकात थोडे बदल करण्यात आले असून यात बालकलाकार मुलगी नसून मुलगा आहे. जान्हवीला कियान नावाचा मुलगा असून या तिघांभोवती मालिकेचं कथानक फिरणार आहे.

इतकंच नाही तर मालिकेच्या प्रोमोशनसाठी शूट करण्यात आलेले प्रोमोसुद्धा बऱ्यापैकी सारखे होते. त्यामुळे या मालिकेची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या प्रोमोप्रमाणेच कियान आर्यमानला तो किती कमावतो असा प्रश्न विचारतो असं दाखवण्यात आलं आहे. फक्त माझी तुझी रेशीमगाठच्या प्रोमोमध्ये यश परीला हॉटेलमध्ये घेऊन जातो असं दाखवण्यात आलं तर या प्रोमोमध्ये आर्यमान कियानला शाळेत भेटण्यास येतो असं दाखवण्यात आलंय.

पहा प्रोमो:

या आधीही 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा रिमेक इतर भाषांमध्ये करण्यात आला आहे. कन्नड भाषेत या मालिकेचा 'सीता रामा' या नावाने रिमेक करण्यात आला होता. झी कन्नडावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तर झी सार्थकवर 'श्री' या नावाने ओडिया भाषेत या मालिकेचा रिमेक करण्यात आला होता.

MTR remake in hindi
Shreyas Talpade: "क्या वाकई में…जो जैसा करता है…वैसा भरता है?"; श्रेयसच्या 'कर्तम भुगतम'चा टीझर रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com