
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. एकीकडे जान्हवी आणि जयंत यांची लव्हस्टोरी तर दुसरीकडे भावना आणि सिद्धू यांचं लग्न. जान्हवी आणि जयंत यांच्यामध्ये प्रेक्षक गुंतले असताना भावना आणि सिद्धू यांचं लग्न नेमकं कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशात आता मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे नेटकरी लेखकावर भडकले आहेत. यांची मुलंच कशी कलंक आहेत असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसतायत.