
आज १० जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जातेय. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. त्यामुळं आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्याला सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. आजचा दिवस हा महिलांसाठी खास असतो. नटून थाटून वडाला फेऱ्या मारणाऱ्या स्त्रिया या आजूबाला पाहायला मिळतात. मराठी सण हे मालिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर साजरे होताना दिसतायत. मात्र मालिकांमध्ये या सणांसोबत त्यात भलताच ट्विस्ट आणला जातो हे मात्र प्रेक्षकांना पटत नाहीये. शिवा मालिकेतही असंच काहीतरी पाहायला मिळतंय. मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.