

CHALA HAWA YEU DYA COMEDICHA GANGWAR
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. तर काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. स्टार प्रवाह आणि झी मराठीवर काही नव्या मालिकांची घोषणा करण्यात आलीये. झी मराठीवर लवकरच 'शुभ श्रावणी' ही मालिका सुरू होतेय. तर स्टार प्रवाहवर 'मी सावित्री जोतीराव फुले', 'वचन दिले तू मला' आणि 'तुझ्या सोबतीने' या मालिकांची घोषणा करण्यात आली. कलर्स मराठीनेदेखील 'बिग बॉस मराठी' सीझन ६ ची घोषणा केलीये. मात्र अशातच झी मराठीच्या एका शोने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.