
छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. या मालिका म्हणजे काहींच्या अगदी सवयीची गोष्ट असते. आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांचे अत्यंत आवडते असतात. हे कलाकार मालिकेतून अचानक गायब झाले तरी प्रेक्षक त्याची दखल घेतात. तोच चेहरा जेव्हा दुसरीकडे दिसतो तेव्हा प्रेक्षक तो चेहरा बरोबर हेरतात. असेच एक अभिनेते मराठी मालिका सोडून आता हिंदी मालिकेत झळकताना दिसतायत. प्रेक्षकांनी त्यांना ओळखलं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मराठी मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता त्याचं कारणही समोर आलंय.