
छोट्या पडद्यावर गेल्या महिन्याभरात अनेक नव्या मालिकांची घोषणा झाली. त्यात स्टार प्रवाह, कलर्स मराठी आणि झी मराठीचा देखील समावेश आहे. झी मराठीवर नुकतीच 'कमळी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. त्यात विजया बाबर आणि अभिनेता निखिल कामत मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे तेजश्री प्रधानची देखील झी मराठीवर एंट्री होणार आहे. झी मराठीवर लवकरच 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमोदेखील समोर आलाय. ही मालिका कधी सुरू होणार याबद्दल माहिती समोर आली नसली तरी त्याच्या पाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज असल्याचं बोललं जातंय.