
Marathi Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये सध्या अक्षरा आणि अधिपती यांच्यात दुरावा आलाय. त्यांच्यातील गैरसमज काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. मास्तरीणबाई म्हणजेच अक्षरा घर सोडून माहेरी गेली आहे. तर अधिपती तिला परत आणण्यासाठी काही खास प्रयत्न करताना दिसत नाहीये. अशातच मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत आता एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे. 'मिसेस मुख्यमंत्री' मधील अभिनेता आता मालिकेत दिसणार आहे.