
गेल्या महिन्याभरात स्टार प्रवाह आणि झी मराठीवर काही नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यांचे प्रोमोही शेअर करण्यात आले. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्टार प्रवाहने त्यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला. 'लपंडाव' असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेता चेतन वडनेरे, अभिनेत्री कृतिका देव आणि अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र आता स्टार प्रवाहला शह देण्यासाठी झी मराठीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. सोबतच त्याचा एक प्रोमोही शेअर केलाय.