
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. या मालिकांचं गणितही टीआरपीवर अवलंबून असतं. ज्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्यात त्यांचा टीआरपी चांगला आहे त्या अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मात्र ज्या मालिकांचा टीआरपी कमी असतो त्या प्रेक्षकांचा निरोप घेतात. त्याजागी दुसऱ्या नवीन मालिका दाखवल्या जातात. अशाच काही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीवर आता चक्क १- २ नाही तर ५ नव्या मालिका सुरू होणार आहेत. पाहूया कोणत्या आहेत त्या मालिका.