
छोट्या पडद्यावर गेल्या महिन्याभरात काही नवीन मालिका सुरू झाल्या. तर काहींची नुकतीच घोषणा करण्यात आली. काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्टार प्रवाह आणि झी मराठी यांनी आपल्या नवीन मालीलकांचे प्रोमो जाहीर केले. झी मराठीवर लवकरच 'तारिणी' ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रोमोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. अशातच आता 'तारिणी' या मालिकेसाठी झी मराठीची कोणती मालिका निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांनी अंदाज लावलाय. पाहूया कोणती मालिका आहे ती.